RCB Powerplay Record : आरसीबीने फायनल सामन्यात रचला इतिहास! मुंबई इंडियन्सचा मोडला १३ वर्षांपूर्वीचा ‘तो’ खास विक्रम
RCB Powerplay Record : या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला १५५ धावांवर रोखले.

RCB Powerplay Wickets Record IPL 2026 Final : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. आरसीबीचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी गुजरात टायटन्सला सुरुवातीचे दोन मोठे झटके दिले. पॉवरप्लेच्या आतच गुजरातचे दोन्ही धोकादायक सलामीवीर साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून आरसीबीने आयपीएलच्या इतिहासातील एका महाविक्रमावर आपले नाव कोरले आहे.
आरसीबीने मोडला स्वतःचा आणि मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड!
या ऐतिहासिक सामन्यापूर्वी, आयपीएलच्या कोणत्याही एका हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ३३ विकेट्सचा होता. हा रेकॉर्ड आरसीबी (२०२३) आणि मुंबई इंडियन्स (२०१३) यांच्या नावावर संयुक्तपणे नोंदवला गेला होता. मात्र, आजच्या महाअंतिम सामन्यात गुजरातच्या दोन फलंदाजांना बाद करताच आरसीबीने या आकड्याला मागे टाकले. यंदाच्या हंगामात पॉवरप्लेमध्ये तब्बल ३५ विकेट्स घेत आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक पॉवरप्ले विकेट्स घेणारा संघ बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
गुजरात टायटन्सकडेही इतिहास बदलण्याची सुवर्णसंधी!
Innings Break!
Washington Sundar fights back but an all-round effort from #RCB restricts #GT to 1️⃣5️⃣5️⃣
Scorecard ▶️ https://t.co/Yz6K3q6w0X#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/1nMfBYvg1D
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
एकीकडे आरसीबीने हा नवा कीर्तिमान स्थापित केला असला, तरी दुसरीकडे गुजरात टायटन्सकडेही हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. गुजरातनेही या हंगामात पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत ३३ विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत, दुसऱ्या डावात आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान जर गुजरातच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये ३ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या, तर ते आरसीबीला मागे टाकून हा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतात.
फायनल सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व –
Hunting in packs, striking in tandem! 👊
Updates ▶️ https://t.co/Yz6K3q6w0X#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT | @RCBTweets pic.twitter.com/YMzYLntz3f
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
यंदाच्या खिताबी लढतीत आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवले आहे. शुबमन गिल आणि साई सुदर्शन या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना स्वस्तात बाद करून आरसीबीने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. आता साऱ्या जगाचे लक्ष याकडे लागले आहे की, गुजरातचे गोलंदाज या विक्रमाला चोख प्रत्युत्तर देणार की आरसीबीचा हा नवा महाविक्रम कायम राहणार!





