RBI Report: एका वर्षात भारतातील नागरिकांनी 44.34 टन सोन्याचे सुवर्णरोखे केले खरेदी

Gold bonds – भारत सरकार आणि रिझव्हर्र् बँकेने नागरीकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी सुवर्ण रोख्याच्या माध्यमातून सोने खरेदी करावी यासाठी सुवर्णरोखे योजना जाहीर केली होती. गेल्या काही वर्षांपासून या योजनेला कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र आता गुंतवणूकदार या योजनेकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
2023 -24 मध्ये भारतातील नागरिकांनी 27,0,31 कोटी रुपयाचे 44.34 टन सोन्याचे सुवर्णरोखे खरेदी केले असल्याची माहिती समोर आली आहे. रिझव्हर्र् बँकेने या संदर्भात दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 2022 – 23 मध्ये भारतीयांनी केवळ 12.26 टन वजनाच्या 6,551 कोटी रुपयांच्या मूल्याचे सुवर्णरोखे खरेदी केले होते.
दरम्यानच्या काळामध्ये सुवर्णरोखे खरेदी केल्यामुळे चांगलाच फायदा होतो, त्याचबरोबर आपली गुंतवणूक सुरक्षित राहते याची माहिती गुंतवणूकदारांना होत आहे. त्यामुळे सुवर्ण रोख्याची खरेदी वाढू लागली आहे. काही वर्षापुर्वी चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही योजना गुंडाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही योजना लोकप्रिय होत असल्यामुळे ही योजना चालू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
2024 मध्ये चार टप्प्यात सुवर्णरोखे जारी करण्यात आले होते. ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून 67 वेळा सुवर्णरोखे जारी करण्यात आले आहेत. यातून 146.96 टन वजनाचे 72,274 कोटी रुपयांचे सुवर्णरोखे विकले गेले आहेत. नागरिकांनी प्रत्यक्ष सोन्याऐवजी सुवर्णरोखे खरेदी करावे यासाठी यातून मिळालेल्या नफ्यावर भांडवली नफा कर लागत नाही.
एक ग्रॅम वजनाच्या स्वरूपातही हे सुवर्णरोखे खरेदी करता येऊ शकतात. या सुवर्णरोख्यावर अडीच टक्के व्याजदर मिळतो. सुवर्णरोख्याची खरेदी अतिशय सोपी आहे. त्याचबरोबर हे सुवर्णरोखे नंतर शेअर बाजारावर नोंदले जाऊ शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये हे सुवर्णरोखे कमालीचे लोकप्रिय होऊ लागले असल्याचे दिसून येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना एक ग्रॅम ते चार किलो पर्यंत सुवर्णरोखे खरेदी करता येतात. ही योजना ही योजना यशस्वी होण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझव्हर्र् बँक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. आता या प्रयत्नांना यश मिळत आहे. आगामी काळात हे सुवर्णरोखे आणखी जास्त प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. यामुळे नागरिकांचा पैसा सोन्यात अडकून न पडता अर्थव्यवस्थेत येतो. त्याचबरोबर सोन्याचे लाभ नागरिकांना मिळतात असे रिझव्हर्र्र् बँकेने स्पष्ट केले आहे.





