संजय मल्होत्रा यांनी आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला ; नवीन आव्हानांसाठी सज्ज

RBI New Governor । भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारत आहेत. संजय मल्होत्रा यांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित गव्हर्नर म्हणून आरबीआयच्या मुख्यालयात स्वागत करण्यात आले. आज त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मंद विकास दर आणि उच्च महागाई दर अशा दुहेरी आव्हानाचा सामना अर्थव्यवस्थेसमोर असताना ते रिझर्व्ह बँकेची जबाबदारी सांभाळणार आहेत.
संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा RBI New Governor ।
संजय मल्होत्रा यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. सोमवारी संध्याकाळी केंद्र सरकारने त्यांची सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली होती आणि आज त्यांनी माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतली आहे.
Shri Sanjay Malhotra takes charge as the 26th Governor of Reserve Bank of India for the next 3 years w.e.f December 11, 2024#RBI #rbigovernor #sanjaymalhotra #rbitoday pic.twitter.com/aa7UdIcWIS
— ReserveBankOfIndia (@RBI) December 11, 2024
सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची प्रतिमा
आपला कार्यभार स्वीकारण्यापूर्वी संजय मल्होत्रा यांनी , ” आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते सर्व विचार समजून घेण्याचा आणि अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतील”असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, नवीन RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची प्रतिमा आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की, केवळ देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे किंमती व्यवस्थापित करणे शक्य नाही, यासाठी सरकारी मदतीची देखील आवश्यकता आहे.
कोण आहेत संजय मल्होत्रा ? RBI New Governor ।
राजस्थानमधील 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी मल्होत्रा यांना सार्वजनिक धोरणाचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे . त्यांना पॉवर, फायनान्स आणि टॅक्सेशन यांसारख्या क्षेत्रात कौशल्य आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यापूर्वी संजय मल्होत्रा अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय, याआधी ते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाचे सचिव पदावर होते.
हेही वाचा
अदानी समूहाने दिले अमेरिकेला प्रत्युत्तर ; श्रीलंकेत ‘हे’ बंदर स्वबळावर बांधण्याचा घेतला निर्णय





