आरबीआयकडून पुन्हा रेपो रेट ‘जैसे थे’ ; गृहकर्जाचा तुमचा हप्ता महागणार कि कमी होणार ? वाचा सविस्तर

RBI MPC Meeting । देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावल्यानंतर आरबीआयने चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) 4.50 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आणला आहे. या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेतील तरलता वाढण्यास मदत होईल. ज्यामुळे बँका अधिकाधिक कर्जे वाटप करून विकासाला गती देतील.
आरबीआयच्या या निर्णयामुळे 1.16 लाख कोटी रुपयांची रोकड वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, आरबीआयने महागड्या ईएमआयमधून ग्राहकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. सेंट्रल बँकेने आपल्या पॉलिसी रेटमध्ये म्हणजे रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 6.50 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही.
RBI ने CRR केला कमी RBI MPC Meeting ।
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये 50 बेस पॉइंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे. सीआरआर 4.50 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे. रोख राखीव प्रमाणातील कपात दोन टप्प्यांत लागू केली जाईल. यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये 1.16 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड येईल.
महागाई नियंत्रणाबरोबरच वाढही आवश्यक
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक ४ डिसेंबरपासून सुरू झाली असून या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय आज जाहीर करण्यात आले आहेत. आरबीआय गव्हर्नर म्हणाले, आमचा उद्देश महागाई नियंत्रणात ठेवणे आणि वाढ कायम ठेवताना किमती स्थिर ठेवणे हे आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले, किमती स्थिर ठेवणे सर्वात महत्वाचे आहे परंतु त्याच वेळी वाढ राखणे देखील महत्वाचे आहे आणि हे आरबीआय कायद्यात देखील म्हटले आहे.
शहरे आणि भागात मागणी कमी RBI MPC Meeting ।
जीडीपी विकास दरातील घसरणीवर, आरबीआय गव्हर्नर म्हणाले, आर्थिक विकास दर घसरण्याचे कारण औद्योगिक उत्पादनातील घट आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक विकास दर 7.2 टक्के होता, जो दुसऱ्या तिमाहीत 2.1 टक्क्यांवर आला. ते म्हणाले, उत्पादन विकास दर कमी झाला आहे. RBI गव्हर्नर म्हणाले, ग्रामीण भागात मागणी वाढली आहे, परंतु शहरी भागात मागणी मंदावली आहे.
आरबीआयकडून जीडीपीचा अंदाज कमी
आरबीआयने विकास दराचा अंदाज कमी केला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, आरबीआयने जीडीपी वाढीचा दर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, जो पूर्वी 7.2 टक्के होता. RBI ने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत GPP वाढीचा दर 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी 6.8 टक्के असा अंदाज वर्तवला आहे.





