RBI MPC । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले. RBI गव्हर्नरने आज रेपो दरात कोणतीही कपात केली नाही. यामुळे ईएमआयवर कोणताही दिलासा आरबीआयकडून देण्यात आला नाही. मात्र, आरबीआयने शेतकऱ्यांना एक भेट दिली असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवली आहे. RBI ने कोणती घोषणा केली ? RBI MPC । RBI ने शेतकऱ्यांना तारण मुक्त कर्जाची मर्यादा सध्याच्या 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे. याचा फायदा लहान व मध्यम शेतकऱ्यांना होणार आहे. या घोषणेचा स्पष्ट अर्थ असा आहे की, आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी काहीही तारण ठेवावे लागणार नाही. पूर्वी ही मर्यादा १.६ लाख रुपये होती, म्हणजेच कोणतेही तारण न ठेवता, शेतकरी केवळ १.६ लाख रुपयांपर्यंतच कर्ज घेऊ शकत होते, ज्याची मर्यादा आता २ लाख रुपये झाली आहे. RBI ने CRR कमी केला RBI MPC । चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात सलग 11व्यांदा, RBI ने शुक्रवारी पॉलिसी रेट रेपोमध्ये कोणताही बदल केला नाही आणि तो 6.5 टक्के ठेवला. मात्र, अर्थव्यवस्थेत रोख वाढवण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती बँकेने सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) ४.५ टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला. या पाऊलामुळे बँकांमध्ये 1.16 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड येईल. जीडीपीचा अंदाजही कमी झाला यासोबतच सध्याची परिस्थिती पाहता आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज 7.2 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांवर आणला आहे. ऑक्टोबर एमपीसीमध्ये, आरबीआयने देशाचा जीडीपी 7.2 टक्के वेगाने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दराचा अंदाज 4.5 टक्क्यांवरून 4.8 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. हेही वाचा आरबीआयकडून पुन्हा रेपो रेट ‘जैसे थे’ ; गृहकर्जाचा तुमचा हप्ता महागणार कि कमी होणार ? वाचा सविस्तर