शक्तीकांत दास यांचा जगात पहिला क्रमांक: सलग दुसऱ्या ‘अव्वल बँकर’, मिळाले ‘A+’ रेटिंग

rbi governor shaktikanta das – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून निवड झाली आहे. शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ रेटिंग मिळाले आहे.
महागाई वर नियंत्रण, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण यासाठी शक्तीकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला आहे. गेल्या वर्षीही ते सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून निवडले गेले होतो.
गेल्या वर्षी जूनमध्ये लंडनमध्ये सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स 2023 मध्ये दास यांना ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या पॅरामीटर्सवर गव्हर्नरना रेटिंग –
ग्लोबल फायनान्स मासिकानुसार, त्यांनी दिलेले ग्रेड महागाई नियंत्रण, आर्थिक विकासाची उद्दिष्टे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनात यश मिळवण्यासाठी A ते F या स्केलवर आधारित आहेत. ‘A’ उत्कृष्ट कामगिरीचे प्रतिनिधित्व करतो आणि ‘F’ संपूर्ण अपयशाचे प्रतिनिधित्व करतो.
ग्लोबल फायनान्सचे वार्षिक सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड अशा बँक गव्हर्नरांना सन्मानित करते ज्यांच्या धोरणांनी मौलिकता, सर्जनशीलता आणि दृढता याद्वारे त्यांच्या समकक्ष बँकांना मागे टाकले आहे, असे मासिकाने म्हटले आहे.
सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकात 1994 पासून दरवर्षी प्रकाशित केले जाते. यामध्ये, 101 देश, प्रदेश आणि जिल्ह्यांच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरना श्रेणीबद्ध केले आहे. यामध्ये बँक ऑफ युरोपियन युनियन, इस्टर्न कॅरिबियन सेंट्रल बँक, बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्स आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स यांचाही समावेश आहे.
शक्तीकांत दास हे RBI चे 25 वे गव्हर्नर –
शक्तीकांत दास हे RBI चे 25 वे गव्हर्नर आहेत. ते 1980 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. दास यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयने जवळपास दीड वर्षे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. याशिवाय महागाईही नियंत्रणात आली आहे. या कालावधीत, देशाने 8% पेक्षा जास्त आर्थिक विकास दर देखील गाठला आहे.




