Ravindra Jadeja Dropped : न्यूझीलंड दौऱ्यातील वनडेतून रवींद्र जडेजाला डच्चू; वर्ल्ड कप २०२७ च्या योजनेतून बाहेर, कारकीर्द संपुष्टात येण्याची चिन्हे
Ravindra Jadeja Dropped : न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल आणि नमन धीर यांचा समावेश आहे. मागील एकदिवसीय मालिकेत खेळलेल्या जडेजाला संघात स्थान देण्यात आले नाही.

Ravindra Jadeja Dropped From India ODI Squad for New Zealand Tour : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय समोर आले आहेत. मोहम्मद शमी आणि यशस्वी जैस्वाल यांच्या वगळण्यावरून आधीच चर्चा रंगलेली असताना, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा याला वनडे संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने दोन स्वतंत्र संघ जाहीर केले असले तरी जडेजाला एकाही संघात स्थान मिळालेले नाही. या निर्णयामुळे जडेजाची वनडे कारकीर्द आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन्ही वनडे संघांतून पत्ता कट; अक्षर पटेलला पसंती –
कसोटी मालिका खेळणारे प्रमुख खेळाडू अखेरच्या दोन वनडे सामन्यांमधून बाहेर पडणार असल्याने जडेजाला किमान पहिल्या तीन सामन्यांसाठी निवडले जाईल, असा अंदाज होता. मात्र, निवड समितीने पहिल्या तीन सामन्यांसाठीही त्याचा विचार केला नाही. त्याच्या जागी अक्षर पटेल आणि नमन धीर या फिरकी अष्टपैलू खेळाडूंवर विश्वास दाखवण्यात आला आहे. कसोटी संघात जडेजाची निवड झाली असली तरी ५० षटकांच्या क्रिकेटमधून त्याला पूर्णपणे दूर ठेवण्यात आले आहे.
वर्ल्ड कप २०२७ च्या नियोजनातून जडेजा थेट बाहेर –
🚨 INDIA’S ODI SQUAD ANNOUNCEMENT 🇮🇳🏏
Several big names are missing from India’s squad for the upcoming ODI series against New Zealand! 😳
Yashasvi Jaiswal and Ravindra Jadeja have been dropped, while Rajat Patidar and Mohammed Shami have been overlooked once again. ❌
Are these selection decisions justified? 🤔👇
.
.
.
#TeamIndia #INDvNZ #ODI #YashasviJaiswal— cricketmoodofficial (@cricketmoodcom) October 16, 2026
वृत्तानुसार निवड समितीने जाडेजाच्या भविष्याचा विचार करूनच हा कठोर निर्णय घेतला आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दीर्घकालीन योजनेत जडेजा आता बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्वचषकाला जेमतेम एक वर्ष शिल्लक असल्याने आगामी वनडे सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना पुरेशी संधी मिळावी, या उद्देशाने निवडकर्त्यांनी जडेजाला वगळून अक्षर पटेलला प्रमुख पसंती दिली आहे.
गोलंदाजीतील सुमार कामगिरी ठरली कारणीभूत –
गेल्या काही महिन्यांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये जडेजाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. २०२५ पासून आतापर्यंत खेळलेल्या १५ वनडे सामन्यांत त्याला केवळ १४९ धावा करता आल्या असून अवघ्या १४ विकेट्स घेता आल्या आहेत. विशेषतः मार्च २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतरच्या ८ सामन्यांत त्याने केवळ ३ विकेट्स टिपले आहेत. २०२६ मध्ये तर सलग चार सामन्यांत तो एकही विकेट्स मिळवू शकला नव्हता, अखेर या खराब फॉर्मचा फटका त्याला संघातून बाहेर पडून सहन करावा लागला.





