स्वतःच्या नावे ४ कोटी ८० लाख तर पत्नीच्या नावे… वाचा रवींद्र धंगेकर यांची एकूण संपत्ती

Lok Sabha Election 2024 । पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे एकूण 4 कोटी 82 लाख 90 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे, तर पत्नीच्या नावे एकूण 3 कोटी 33 लाख 11 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे मिळून 8 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर धंगेकर यांच्या नावावर 35 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज आणि पत्नीच्या नावावर 32 लाख 42 हजार रुपयांचे कर्ज असल्याचे धंगेकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.
धंगेकर कुटुंबीयांकडील मालमत्तेचा तपशील
– वार्षिक उत्पन्न – 8 लाख 7 हजार रुपये
– व्यवसाय – शेती व सोने- चांदी कारागिरी
– मुदत ठेवी, म्युच्युअल फंड , सोने एलआयसीमधील गुंतवणूक – 95 लाख 64 हजार 526 रुपये
– जमिन, सदनिका यांची किंमत – 7 कोटी 20 लाख 36 हजार 952 रुपये
( पिंपळगाव, कोथरूड नांदोशी येथे जमीन तर कसबा पेठ, रविवार पेठ येथील मिळकती व जमीन )
– वाहने – अॅक्टिव्हा दुचाकी
– शिक्षण – आठवी पास




