Politics : रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना धमकीवजा इशारा; म्हणाले “तुम्ही जामीनावर बाहेर…”

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेतील आपल्या भाषणात उद्योगपती गौतम अदानी यांच्या विषयावर भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यानंतर आता भाजपकडूनही राहुल यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राहुल गांधी स्वत:, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि त्यांचे मेहुणे रॉबर्ट वड्रा हे जामीनावर बाहेर आहेत याचे राहुल यांनी स्मरण ठेवावे असा धमकीवजा इशारा त्यांना माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून देण्यात आला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/agniveer-is-the-idea-of-rashtriya-swayamsevak-sangh-rahul-gandhi/
राहुल यांच्याकडून मोदी सरकारवर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे म्हणत त्यांनी या आरोपांची निंदा केली. मात्र त्याच वेळी नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणाबाबत राहुल यांचे काय म्हणणे आहे, असा सवालही केला.





