‘नटरंग’नंतर रवी जाधव घेऊन येणार नवा चित्रपट; दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेअर केले पोस्टर

Ravi Jadhav | ‘नटरंग’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. रवी जाधव यांचं दिग्दर्शन असलेल्या नटरंगची कथा आणि उत्कृष्ट गाणी प्रेक्षकांना भावली. नटरंग या तमाशापटातून त्यांनी एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर मांडली.15 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा आणि त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता दिग्दर्शक रवी जाधव आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. ज्याचे नाव आहे ‘फुलवरा’.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोशल मिडियावर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच चित्रपटाचे नवे पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे ‘द फोक आख्यान’ ज्याच्या लेखन आणि निवेदनातून सजलं आहे त्या ईश्वर अंधारे आणि हर्ष-विजय या तरुण संगीतकार जोडीनं सिनेमाला संगीत दिलं आहे.
View this post on Instagram
‘फुलवरा’बद्दल सांगताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “तमाशा हा माझा आवडता लोककला प्रकार आहे. तमाशाच्या फडावरती हे कलावंत आपली कला सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तेवढंच रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं. यावर आधारीत एक विषय माझ्या डोक्यात होता. याचदरम्यान मी ‘द फोक आख्यान’ हा एक अनोखा लोककलाविष्कार बघितला आणि त्या सादरीकरणाने मी भारावून गेलो. त्यांचा हा ध्यास बघूनच त्यांच्या सोबतीने लोककलेचा एक नवा अध्याय प्रेक्षकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा असा विचार मनात आला आणि त्यातूनच ‘फुलवरा’ चित्रपटाची गोष्ट तयार झाली.” Ravi Jadhav |
‘फुलवरा’ चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा-पटकथा-संवाद आणि गीते ईश्वर ताराबाई अंधारे यांची आहे. संगीत हर्ष-विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर (झी स्टु़डिओज) आणि मेघना जाधव (अथांश कम्युनिकेशन) यांची आहे. या चित्रपटातील कलाकारांबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Ravi Jadhav |
हेही वाचा:





