मलायका अरोराच्या बर्थडेनिमित्त अर्जुन कपूरने केली खास पोस्ट, मिरर सेल्फीसह Baby असा उल्लेख करत लिहिले..

मुंबई – आज मलायका अरोराचा वाढदिवस आहे. ती आज ४८ वर्षांची झाली. इंडस्ट्रीमधील तिचे मित्र आणि चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशात तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरनेही तिला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने मलायकासोबतच एक मिरर सेल्फी अपलोड करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मलायका-अर्जुन ही जोडी गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. दोघांनी कधीही समोर येऊन आपल्यातील रिलेशनबाबत भाष्य केलेलं नाही. परंतु अनेकदा न बोलताही दोघेही बरंच काही सांगून जातात.म्हणूनच अर्जुन कपूरची ही बिर्थडे पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. फोटोसह अर्जुनने The Yin to my Yang…Happy Birthday Baby Just be You, be happy, be mine… असं कॅप्शन देखील दिले आहे.
View this post on Instagram
अर्जुनच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत मलाइकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा जेव्हा जेव्हा एकत्र दिसतात किंवा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करतात तेव्हा इंटरनेटवर खळबळ उडते.


