रवीना टंडनच्या लेकीची बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री; पहिल्याचं गाण्यात लावले चारचाँद

Raveena tandon daughter | अभिनेत्री रवीना टंडनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सर्वांना घायाळ केले आहे. आता रवीनाच्या लेकीने देखील बॉलीवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला आहे. रवीना टंडनची मुलगी राशा थडानीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘आझाद’ या चित्रपटातून राशाने बॉलिवूड इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री केली आहे.
‘आझाद’ चित्रपटातील राशाचं पहिलं आयटम साँग नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित जालं आहे. ‘ऊई अम्मा’ असं या गाण्याचं नाव असून प्रदर्शित या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यातील तिचा अप्रतिम डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी तिचं भरभरून कौतुक करत आहेत. Raveena tandon daughter |
Watch #rashathadani sizzling dance moves in her new song #uyiamma out now …get set for new party song …
#Azaad #AamanDevgan #bollywood #bollywoodnews #bollywoodsongs #bollywoodmovies #reelsvideoシ pic.twitter.com/wOdwGILvmD— Ankit Srivastav (@iamankshree) January 4, 2025
मधुबंती बागची यांचा आवाज आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या संगीताने हा ट्रॅक अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केला आहे. बॉस्को लेस्ली मार्टिसने कोरिओग्राफ केलेले ‘उई अम्मा’ हे गाणे हिट ठरत आहे. Raveena tandon daughter |
दरम्यान, राशाचा ‘आझाद’ हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून राशासोबतच अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगणसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये अजय देवगणची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व भारताची कहाणी दाखवतो. हा चित्रपट एका कुशल घोडेस्वाराची (अजय देवगण) कथा सांगतो जो क्रूर इंग्रजी सैन्याच्या तावडीतून सुटतो. त्याचा घोडा बेपत्ता होतो आणि त्यानंतर तो एका लहान मुलाच्या मदतीने मिशनवर जातो.
हेही वाचा:





