रवीना टंडनच्या मुलीला मिळाली मोठी संधी! तेलुगू चित्रपटसृष्ट्रीत करणार धमाकेदार एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Rasha Thadani : अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आता बॉलिवूडनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीतही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. राशाने तेलूगू चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘आझाद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. तिने ‘ओये अम्मा’ या गाण्याने सर्वांची मने जिंकली होती. आता तिने आपला मोर्चा साऊथ चित्रपटसृष्टीकडे वळवला असून, सोशल मीडियावर नव्या तेलूगू चित्रपटाची घोषणा केली आहे.
राशाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक जबरदस्त लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाईकसोबत पोज देताना दिसत आहे. या पोस्टरसोबत राशाने “नवीन सुरुवात, अंतहीन कृतज्ञता. मी तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे.” असे कॅप्शन दिले आहे. पोस्टमध्ये राशाने अजय भूपतीचे आभार मानले आहे. “सर, या संधीबद्दल खूप खूप धन्यवाद. मी हा प्रवास सुरू करण्यास खूप उत्सुक आहे.” असे म्हटले आहे.
View this post on Instagram
राशाने या पोस्टमध्ये चित्रपटाचे नाव उघड केलेले नाही. परंतु, तिच्या बोल्ड आणि हॉट लूकवरून असे दिसते की ती यावेळी काहीतरी वेगळे आणि हटके करणार आहे. राशाचा तेलुगू डेब्यू हा अजय भूपती दिग्दर्शित करणार आहे. अजयने अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ज्यात त्याचा पहिला चित्रपट “RX 100,” “महा समुद्रम,” आणि “मंगलावरम” यांचा समावेश आहे. दिग्दर्शक असण्यासोबतच अजय एक उत्तम लेखकही आहे. आझाद हा अभिषेक कपूर दिग्दर्शित एक पीरियड अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे. यात अमन देवगण, राशी थडानी आणि अजय देवगण, डायना पेंटो हे कलाकार आहेत. हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा : ‘पती पत्नी और पंगा’ शोमध्ये रुबिना दिलैक-अभिनव शुक्लाची जोडी ठरली विनर





