90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रवीना टंडनने प्रत्येक वेळी आपल्या कामाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे. रवीनाने साऊथ चित्रपट आणि ओटीटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत कमबॅक केले आहे. रवीना टंडनने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर इतर अनेक इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने आपल्या कामाने सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच अभिनेत्रीने साऊथ इंडस्ट्री आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमधला मोठा फरक दाखवून दिला. रवीना टंडनने तकदीरवाला चित्रपटाच्या शूटिंगचा काळ आठवला आणि सांगितले’साऊथच्या कमी बजेटच्या चित्रपटांमध्येही तिला कोणतीही कमतरता भासली नाही. कमी बजेटमध्येही साऊथ इंडस्ट्री कशी चांगली काम करते हे पाहून रवीना खूपच प्रभावित झाली. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत व्यंकटेशही मुख्य भूमिकेत होता. रवीनाने सांगितले,’आम्ही मॉरिशसमध्ये फक्त 9 लोकांच्या टीमसह चित्रपटाची पाच गाणी शूट केली, ज्यामध्ये लाइट मॅन नाही, जनरेटर नाही, लाईट नाही, काहीही नाही. त्याने दोन बेबी लाईट आणि फक्त चांदीच्या फॉइलने झाकलेले रिफ्लेक्टरसह गाणे शूट केले. अशाप्रकारे सर्व गाणी चित्रित केली गेली आणि त्या गाण्यांचा दर्जा तुम्हाला दिसतो. हिंदी चित्रपटाबाबत सांगतांना ती म्हणाली,’निर्माते सुमारे 200 लोकांची टीम तयार करतात, जे दक्षिण चित्रपटांपेक्षा खूप जास्त आहे. जेव्हा मी मुंबईत शूटिंग करायचे आणि आम्ही इथून स्वित्झर्लंड किंवा इतर ठिकाणी जायचो तेव्हा आमच्यासोबत 200 लोक जायचे. मी म्हणायचे की जेव्हा आपण 10 लोक मिळून हे सर्व काम करू शकतो तर मग एवढ्या लोकांची काय गरज आहे? असा प्रश्नही मी उपस्थित करत होते.