राऊतांनी काढला भाजपला चिमटा,’मोदींना देशातील महागाई चिंता नाहीतर, युक्रेन-रशियातील युद्धाची जास्त चिंता’
मुंबई – घरगुती सिलिंडरचे भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलिंडरचा भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. राऊत म्हणाले,’देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर यासंदर्भात भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का? भोंग्यांवर कसले बोलता असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे.
ते पुढे म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. पण देशातील महागाईची त्यांना चिंता नाही.’ असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राऊत यांनी ट्विट करत महागाईवर भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांचे ट्विट
घरगुती गॅसचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 22 मार्च रोजी 50 रुपयांनी वाढली होती
घरेलू रसोई गैस सिलेंडर के दाम 50 रुपये बढ़े. दिल्ली में 14.2 किलो के LPG सिलेंडर की कीमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर हो गई है. नई दरें आज से लागू. घरेलू एलपीजी के दाम 22 मार्च को 50 रुपये बढ़े थे
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 7, 2022





