पुणे जिल्हा | जुन्नर शहर अध्यक्षपदी राउफ खान
Updated On:

जुन्नर, (वार्ताहर) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या जुन्नर शहर अध्यक्षपदी रउफ खान यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
रउफ खान हे गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम समाज सामुदायिक विवाह सोहळे तसेच विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे कादरीया वेलफेयर या संस्थेच्या माध्यमातून राबवित असतात. जुन्नर शहरातील या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नवीन शहर कार्यकारणी लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





