#ICCAwards2021 | सर्वोत्तम कसोटीपटूसाठी अश्विनला नामांकन
Updated On:

दुबई – आयसीसीने यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी कसोटी क्रिकेट गटात भारताचा अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला नामांकन दिले आहे.
मात्र, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम पुरस्कारासाठी आयसीसीने चार खेळाडूंची नावे निश्चित केली असून त्यात मात्र एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिलेले नाही.
या चार खेळाडूंमध्ये इंग्लंडचा जोस बटलर, श्रीलंकेचा वनिंदू हसारंगा, ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श आणि पाकिस्तानचा महंमद रिझवान यांचा समावेश आहे. या चार खेळाडूंमधून वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूची निवड केली जाणार आहे.





