पुणे जिल्हा | बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार

बारामती, (प्रतिनिधी) – आगामी काळात येणाऱ्या विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात १०९ मतदारसंघात पक्षाचे उमेदवार देणार असून त्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
बारामती येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बारामती तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये संपूर्ण मतदारसंघ बुथ बांधणी चालू झाली असून येणाऱ्या काळात बारामतीमध्ये लवकरच बुथ प्रमुखांचा मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली. या वेळी बैठकीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, पक्ष निरीक्षक बारामती किरण गोफणे,
माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य संदीप चोपडे, बारामती तालुका अध्यक्ष अॅड. अमोल सातकर, महादेव कोकरे, काका बुरुंगले, दादा भिसे,चंद्रकांत वाघमोडे, दिलीप कोकरे, घनश्याम देवकाते, शैलेश घाडगे, स्वप्नील जगतात, निखिल दांगडे, डाॅ नवनाथ मलगुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.





