Rashtrapati Bhavan fire: राष्ट्रपती भवनाजवळ भीषण आग! नॉर्थ ब्लॉकमध्ये धुराचे लोट; अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल
Rashtrapati Bhavan fire: राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाजवळ असलेल्या नॉर्थ ब्लॉक परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे दाट काळे लोट पसरल्याचे दिसून आले.

Rashtrapati Bhavan fire: राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाजवळ असलेल्या नॉर्थ ब्लॉक परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे दाट काळे लोट पसरल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्ली अग्निशमन विभागाला नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत किती नुकसान झाले किंवा कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Rashtrapati Bhavan fire:
Noticed thick smoke rising from behind North Block while on my way to Parliament. It appears there may be a fire. Hope everyone is safe and emergency services are responding swiftly. https://t.co/mnUqpWfsWl
— Milind Deora | मिलिंद देवरा (@milinddeora) October 26, 2026
राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही या घटनेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून दिली. संसदेकडे जात असताना नॉर्थ ब्लॉकच्या मागील बाजूने दाट धूर निघताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, परिसरातील सर्वजण सुरक्षित असावेत, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
देवरा यांनी या घटनेशी संबंधित छायाचित्रही शेअर केले असून त्यामध्ये नॉर्थ ब्लॉक परिसरातून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसत आहे. आगीचे कारण, नुकसानीचा तपशील आणि संभाव्य जीवितहानीबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. Rashtrapati Bhavan fire:




