Rashmika Mandanna: शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; डॉक्टरांचा सहा आठवडे बेडरेस्टचा सल्ला
Rashmika Mandanna रश्मिका सध्या 'रणबली' आणि 'मैसा' (Maisa) या चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिच्या दुखापतीमुळे या दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळापत्रकात बदल करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांनाही आता नव्याने शूटिंगचे नियोजन करावे लागणार असून, त्यामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्याबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन करत असताना ती गंभीर जखमी झाली आहे. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी तिला तब्बल सहा आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त होती. या चित्रपटासाठी ती अवघड अॅक्शन सीन्स आणि मोठ्या डान्स सिक्वेन्सचे शूटिंग करत होती. अशाच एका अॅक्शन सीनदरम्यान तिचा तोल गेला आणि ती गंभीर जखमी झाली. हा प्रकार घडताच चित्रपटाच्या सेटवर एकच खळबळ उडाली. ( Rashmika Mandanna)
अपघातानंतर सेटवर तातडीने डॉक्टरांच्या टीमला बोलावण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर रश्मिकाला अधिक वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्या कंबरेच्या खालच्या भागातील टेंडन पूर्णपणे तुटल्याचे (Complete Tendon Detachment) निदर्शनास आल्याचे वृत्त आहे. ही दुखापत अत्यंत गंभीर मानली जाते आणि अशा प्रकारच्या दुखापती प्रामुख्याने व्यावसायिक खेळाडूंमध्ये आढळतात, असे डॉक्टरांनी सांगितले. ( Rashmika Mandanna)

Rashmika Mandanna
डॉक्टरांच्या मते, सलग डान्स, अॅक्शन सीन्स आणि शारीरिक मेहनतीमुळे स्नायूंवर आणि टेंडनवर मोठा ताण आला होता. त्यातूनच ही गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे रश्मिकाला कोणत्याही प्रकारची धावपळ किंवा शूटिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेण्यासाठी किमान सहा आठवडे बेडरेस्ट आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. (Rashmika Mandanna)
रश्मिका सध्या ‘रणबली’ आणि ‘मैसा’ (Maisa) या चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिच्या दुखापतीमुळे या दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळापत्रकात बदल करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांनाही आता नव्याने शूटिंगचे नियोजन करावे लागणार असून, त्यामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रश्मिकाच्या दुखापतीची बातमी सोशल मीडियावर समोर येताच तिचे चाहते चिंतेत पडले. अनेकांनी सोशल मीडियावर तिच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत ती लवकरात लवकर पूर्णपणे बरी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. (Rashmika Mandanna)
रश्मिका मंदाना ही सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता असते. अशा वेळी शूटिंगदरम्यान झालेल्या या दुखापतीमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सध्या रश्मिका वैद्यकीय देखरेखीखाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण विश्रांती घेत आहे. योग्य उपचार आणि विश्रांतीनंतर ती पुन्हा एकदा जोमाने शूटिंगला परतेल, अशी अपेक्षा तिचे चाहते व्यक्त करत आहेत. (Rashmika Mandanna)





