‘आशिकी 3’मध्ये रश्मिका मंदान्ना – कार्तिक आर्यनची दिसणार केमिस्ट्री

मुंबई – साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवताना दिसत आहे. तिच्या बकेट लिस्टमध्ये काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये ती दिसणार आहे. त्यातील एक म्हणजे ‘गुडबाय’. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला. पण आता रश्मिकाशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. खरंतर रश्मिका मंदान्ना ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
‘आशिकी 3’च्या निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही अभिनेत्रीला फायनल केले नसून मीडियालाही स्पष्टीकरण पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र एका ऑनलाइन पोर्टलनुसार, कार्तिक आर्यन सोबत मुख्य भूमिका करण्यासाठी रश्मिका मंदान्ना चे नाव फायनल झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस हा संगीतमय चित्रपट सुरू होणार आहे.
‘गँगस्टर’ आणि इतर काही प्रोजेक्ट्सवर भट्ट कॅम्पसोबत काम केलेले अनुराग बसू ‘आशिकी 3’ दिग्दर्शित करत आहेत. आता आधुनिक प्रेक्षकांसाठी तो कोणत्या प्रकारची प्रेमकथा तयार करतो हे पाहायचे आहे. महेश भट्ट यांची या प्रकल्पातील अनुपस्थितीमुळे अनुराग बसू आणि त्यांच्या टीमसाठी हा प्रकल्प आव्हानात्मक होईल.





