Rashami Desai : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई हिने आपल्या मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. तिने तब्बल ८ वर्षं डिप्रेशनशी झुंज दिली, हा काळ तिच्या आयुष्यातला सर्वात कठीण असल्याचं तिने सांगितलं. एका मुलाखतीत रश्मी म्हणाली, “एक असा काळ होता, जेव्हा मी सलग ८ वर्षं डिप्रेशनमध्ये होते. माझ्यावर खूप ओझं होतं. सगळं कमी करून पुन्हा नव्यानं सुरुवात करायला मला अनेक वर्षं लागली. पण आता मी पुन्हा उभी राहिले आहे.” ती पुढे म्हणाली की, “आयुष्यातले चढ-उतार आपणच ठरवतो. आपल्या कामाची जर्नी दुसरं कोणी ठरवत नाही. काम मला शांतता देतं. ते माझं पळून जाण्याचं जगही होतं, हे मला खूप उशिरा समजलं. आता मी आयुष्य आणि काम यामध्ये सुंदर असा समतोल साधला आहे.” कठीण पण शिकवण देणारा काळ रश्मीसाठी हा काळ खूप लांब आणि त्रासदायक होता. डिप्रेशनमधून बाहेर येणं सोपं नव्हतं, पण तिने हार मानली नाही. हळूहळू स्वतःला सावरत तिने मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं आणि पुन्हा योग्य मार्गावर आली. रश्मी देसाईचा करिअर प्रवास रश्मी देसाई ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने ‘उतरन’, ‘दिल से दिल तक’ सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच ती बिग बॉस १३, खतरों के खिलाड़ी ६, नच बलिए ७, झलक दिखला जा ७ या रिएलिटी शोमध्येही झळकली आहे.