संविधानाचे महत्व सांगणाऱ्या “रेरेस्ट ऑफ रेर” लघुपटाचे मंगळवारी लोकार्पण

पुणे – अन्याय अत्याचारावर निडरपणे आवाज उठवून संविधानाचे महत्व, मानवतावादी मूल्ये आणि माणूसपणाच्या विविध शैलिंची सांगड गुंफलेल्या “रेयरेस्ट ऑफ रेयर’ या लघुपटाचे लोकार्पण मंगळवार (दि. १० सप्टेंबर) रोजी होत आहे. मिलिंद जावळे यांचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या या लघुपटात संविधानाचे महत्व अधोरेखित करण्यात आलं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपीआय डेमोक्रेटिक सोशलिस्टचे प्रा. प्रेमरत्न चौकेकर तर उद्घाटक कला दिग्दर्शक संतोष संखद आहेत. प्रमुख पाहुणे लोकमतचे संजय आवटे व संविधान अभ्यासक सुभाष वारे असणार आहेत.
मुकनायकचे तुषार गायकवाड, ज्येष्ठ नाटककार भगवान हिरे, दिग्दर्शक, लेखक सूर्यकांत तिवडे, समाजसेविका रंजना कांबळे, शाई प्रतिष्ठानचे प्रमुख गणेश बनसोडे, अश्वमेध प्रोडक्शनचे राजेंद्र झेंडे, बसपा, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप कुसाळे, संविधान प्रचारक संदीप बर्वे, अभिनेते रवींद्र बाराथे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लघुपटाचे गीत संगीत हृदयमानव अशोक यांनी केले असून मिलिंद सावळे यांनी गायन केले आहे.
सुधीर जावळे, अस्मिता जावळे, तनया जावळे, जे संयुक्ता यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. शितल यशोधरा या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. १० सप्टेंबर रोजी लोकार्पण सोहळा एस एम जोशी फाउंडेशन नवी पेठ पुणे येथे सायंकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे. त्याच दिवशी हा लघुपट प्रेक्षकांना समाज माध्यमांवर पहायला मिळेल.





