Raftaar Wedding : रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधात; ‘या’ अभिनेत्रीसोबत थाटणार संसार, फोटो अन् Video समोर

प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला असून नुकतेच त्याच्या एका चाहत्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिलीन नायर उर्फ रफ्तारचे लग्न फॅशन स्टायलिस्ट आणि अभिनेत्री मनराज जावंदासोबत झाले आहे. रफ्तार आणि मनराज यांचा पारंपारिक पद्धताने विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांना चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत रफ्तार आणि मनराज एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत, तर त्यांच्या आजूबाजूला त्यांचे प्रियजन उपस्थित आहेत. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओसोबतच त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रफ्तार आणि मनराजचे त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा देत आहे. रफ्तार आणि मनराज यांच्या हळदी आणि संगीत समारंभाचा व्हिडिओही समोर आला असून आणखी एका व्हिडिओमध्ये हे दोघेही ‘सपने में मिलती है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
रफ्तार 2016 मध्ये अडकला होता लग्नबंधनात, पण
याआधी रफ्तारने 2016 मध्ये कोमल वोहरासोबत लग्न केले होते, मात्र हे लग्न काही वर्षेच टिकू शकले. दोघांचे लग्नापूर्वी पाच वर्षे प्रेमसंबंध होते. रफ्तार त्याच्या शानदार रॅप शैलीसाठी ओळखला जातो. ‘माफिया मुंडिर’ या भूमिगत हिप-हॉप ग्रुपमधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली.
रफ्तारचा प्रवास
यानंतर त्यांनी एकल कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आणि ‘स्वॅग मेरा देसी’, ‘धाकड’ (‘दंगल’ चित्रपटातील गाण) आणि ‘बेबी मारवाके मानेगी’ सारखी हिट गाणी त्याने दिली आहेत. रफ्तारने ‘एमटीव्ही हसल’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये जज म्हणूनही काम केले आहे. संगीताव्यतिरिक्त रफ्तारने बॉलीवूड आणि स्वतंत्र कलाकारांसोबत अनेक प्रोजेक्ट्सवर देखील काम केले आहे. रोडीजच्या काही सीझनमध्ये तो गँग लीडर म्हणूनही दिसला होता.





