‘अश्लील व्हिडीओ करुन वर्षभर अत्याचार, शरद पवारांची भीती दाखवत धमकावले’; राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत

Updated On:

पुणे – सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले असतानाच राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर  यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. अश्लील व्हिडीओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांची भीती दाखवून धमकवल्याचा दावाही पीडित महिलेले केला आहे.

पीडित महिलेने आज पुण्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राजेश विटेकर यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

पीडित महिला म्हणाली कि, माझे अश्लील व्हिडीओ तयार करुन वर्षभर अत्याचार करण्यात आले. मी याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगितले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात