बलात्कार प्रकरण: खासदार राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढणार
Updated On:

नागपूर – खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालिअन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर आज त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. दिशा सालिअन प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिलेले असताना राहुल शेवाळे यांच्याविरोधातही एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली आहे.
त्यांची मागणी मान्य झाली असून विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी राहुल शेवाळे प्रकरणात एसआयटी चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप जुलै महिन्यात करण्यात आला होता. लग्नाचं आमिष दाखवून खासदार राहुल शेवाळे यांनी आपले मानसिक आणि शारीरिक शोषण केले असा आरोप दुबईतील एका व्यापारी महिलेने केला होता. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.





