Dhurandhar 2 Teaser Release : आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. आता धुरंधर २ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. धुरंधर चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घालत अनेक चित्रपटांचे रेकॅार्ड ब्रेक करत तुफान कमाई केली. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२६ च्या मार्चमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर धुरंधर २ (Dhurandhar 2) चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, हाही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवत हिट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. रणवीर सिंहने केले पोस्टर शेअर कालच अभिनेता रणवीर सिंहने “धुरंधर २” चित्रपटातील स्वतःचा खतरनाक लूक असलेले पोस्टर सोशल मीडियावरून शेअर केले होते. या पोस्टरमध्ये अभिनेता रक्ताने माखलेला, काळा रंगाचा कोट घातलेला आणि कॅमेऱ्याकडे रागाने पाहत असल्याचे दिसत आहे. पोस्टर शेअर करताना, “आता गोष्टी गोंधळात टाकण्याची वेळ आली आहे.” असे कॅप्शन पोस्टला रणवीरने दिले आहे. धुरंधर चित्रपटाचा दुसरा भाग “धुरंदर: द रिव्हेंज” १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. धुरंधरमध्ये रणवीर सिंहचे पात्र फार कमी दाखवण्यात आले, असा दावा अनेकांकडून करण्यात आला होता. अभिनेता अक्षय खन्नाला चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळवून दिली. आता दुसरा भाग हा सर्वस्वी रणवीर सिंहचा असणार आहे, असे टीझर पाहिल्यानंतर लक्षात येते. आदित्य धरने केली होती घोषणा टीझरमध्ये पुन्हा एकदा धुरंधर लूकमध्ये रणवीर अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटात त्याच्या पूर्वाआयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला असून, रणवीरची मेहनत किती घेतली असेल याची प्रचिती टीझर पाहिल्यानंतर जाणवते. मंगळवारी सकाळीच सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत दिग्दर्शक आदित्य धर याने धुंरधर २ चा टीझर प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले होते. हेही वाचा : US Tariff Cut India: ट्रम्प यांनी खरी मैत्री निभावली ; भारतावर पाकिस्तान, बांगलादेश अन् चीनपेक्षाही कमी टॅरिफ