वाढलेली दाढी अन् केस या चित्रपटातील रणवीर सिंगचा लूक व्हायरल..

Ranveer Singh | अभिनेता रणवीर सिंगकडे २०२५ मध्ये अनेक मोठे प्रोजेक्टस आहेत. या प्रोजेक्ट्सवर काम करणे सुरु झाले आहे. सध्या रणवीर धुरंधर नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच त्याच्या डॅान ३ ची देखील जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून रणवीरच्या लूकची बरीच चर्चा होत आहे. रणवीर जॅाम्बी नावाच्या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय मेहता करणार आहेत. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचे बोलले जात आहे.
धूरंधऱ हा चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा करणार आहेत. रणवीर आणि आदित्य यांनी एकत्र मिळून याआधी अनेक चित्रपट केले आहेत. रणवीर या चित्रपटाच्या शूटिंग करत आहे, ज्यामध्ये त्याचा लांब दाढीचा लूक चर्चेत आहे. रणवीर जॅाम्बी नावाच्या चित्रपटातही काम करणार आहे. ज्याची निर्मिती तो त्याच्या निर्मिती कंपनी मा कसम फिल्म्स अंतर्गत करणार असल्याची माहिती मिळत आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, रणवीर त्याच्या जॅाम्बी चित्रपटावर जोमाने काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय मेहता करणार आहेत. सध्या हा प्रोजेक्ट सुरुवातीच्या टप्प्यावर असून लकरच चित्रपटावर काम सुरू करण्यात येणार आहे. रणवीर स्वत: स्क्रिप्टमध्ये आपल्या सूचना देत असून वर्षाच्या अखेरीस स्क्रिप्ट पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, जर सर्व काही ठीक झाले तर डॉन 3 नंतर हा त्याचा पुढचा चित्रपट असू शकतो.
धुरंधरमध्ये रणवीरसोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर माधव यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची घोषणा जुलै 2024 मध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट 1970 आणि 1980 च्या दशकातील भारतीय गुप्तचर संस्थांवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग मे महिन्यापर्यंत संपण्याची शक्यता आहे, मात्र प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.





