‘अजित डोवाल’ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार रणवीर सिंग, संजय दत्त, आर माधवन अन् अर्जुन रामपाल एकत्र

अभिनेता रणवीर सिंग आदित्य धरसोबतच्या त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. अशात आता जोडीने या चर्चांवर दुजोरा दिला आहे. रणवीर सिंगने आदित्य धरसोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईजही आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आणखी चार कलाकार दिसणार आहे.
View this post on Instagram
रणवीर सिंगसोबत आदित्य धरने संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांनाही आपल्या चित्रपटात कास्ट केले आहे. या घोषणेनंतर चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या सर्व स्टार्सना पडद्यावर एकत्र पाहणे सगळ्यांनाच मजेशीर असणार आहे. चित्रपटाची कथा खूप वेगळी असणार आहे, हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी या स्टारकास्टला एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. जिओ स्टुडिओ आणि बी62 स्टुडिओ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
रणवीर सिंगने अधिकृत पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्टने त्यांच्या संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर हाच फोटो शेअर केला आहे. या फोटोत सर्व स्टारचे चेहरे दिसत आहे. हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. सर्व स्टार्सचा हा कोलाज शेअर करताना रणवीरने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे माझ्या चाहत्यांसाठी आहे.’
रिपोर्टनुसार, हा जिओ स्टुडिओच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल. हा चित्रपट अजित डोवाल यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे. बाकी सर्व स्टार्सच्या पात्रांची माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. रणवीरचे पात्र पंजाबचे आहे. याच कारणामुळे त्याने दाढी वाढवली आहे. आर माधवन आणि अक्षय खन्ना रॉच्या भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे.
===============





