Ranveer Singh : रणवीर सिंहचा सोशल मीडियाला रामराम? इन्स्टावरील सर्व पोस्ट केल्या डिलीट; प्रोफाईल फोटोही दिसेना

Ranveer Singh Birthday : बॅालीवूड अभिनेता रणवीर सिंहचा आज ६ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्याने ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे. रणवीर सिंहने २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॅालीवूडमध्ये एन्ट्री केली. त्याच्या हटके स्टाईने त्याने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली. तरुणांना त्याच्या चित्रपटांनी वेड लावलं. रणवीरचा मोठा चाहता वर्ग आहे. तो सतत त्याच्या हटके स्टाईलने नेहमी चर्चेत असतो. नुकत्याच केलेल्या एका कृतीमुळे रणवीर चर्चेत आला आला असून, त्याच्या कृतीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रणवीरने आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ५ जुलै या दिवशी त्याच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट हटविल्या आहेत. रणवीरचा प्रोफाइल फोटोही दिसत नाही आहे. त्यामुळे रणवीरने सोशल मीडियाला रामराम ठोकला असल्याच्या चर्चांना बीटाऊनमध्ये उधाण आले आहे. रणवीरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील शेवटची स्टोरी ही ’12: 12′ असे लिहिले आहे. त्याला क्रॉस्ड स्वॉर्ड्सचा इमोजी देखील दिला आहे. त्यामुळे याचा अर्थ काय होतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
रणवीर सिंह त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर करत असतो. त्याच्या हटके लूकमधील फोटो नेहमीच लक्ष वेधून घेणारे असतात. मात्र, त्याची ही कृती त्याच्या चाहत्यांना बुचकाळ्यात पाडणारी आहे.
रणवीर सिंह त्याचा आगामी चित्रपट ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरून त्याचे आणि अभिनेता संजय दत्तचे फोटोही व्हायरल झाले होते. या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना हे कलाकार देखील दिसणार आहेत. रणवीर सिंहने ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशी कृती केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
हेही वाचा : “मुंबई ही गुजरातची राजधानी होती”; शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचे विधान





