लखनौ : विश्व हिंदु महासभेचे अध्यक्ष रणजीत यादव यांची लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यादव हे सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले होते,. त्यावेळी लखनौच्या हजरततगंज भागात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्या ते मरण पावले.
विश्व हिंदु महासभा स्थापन करण्यापुर्वी रणजीत यादव हे समाजवादी पक्षात होते. त्यांच्यावर हजरतगंज आणि कैसरबाग दरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी सहा पथके स्थापन केली आहेत. गुन्हे अन्वेषण विभागानेही तपास सुरू केला आहे.
गेल्या सहा महिन्यातील विश्व हिंदु महासभेच्या दुसऱ्या नेत्याची ही हत्या आहे. यापुर्वी ऑक्टोबर 2019मध्ये कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती.