Ranji Trophy 2023 : बंगालला नमवून सौराष्ट्राने ‘रणजी करंडका’वर कोरलं नाव

कोलकाता – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मानाची समजली जात असलेली रणजी करंडक स्पर्धा सौराष्ट्रने जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत सौराष्ट्रने बंगालचा 9 गडी राखून पराभव केला. दोन्ही डावांत मिळून 9 गडी बाद केलेला सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सामन्याचा मानकरी ठरला. गेल्या तीन मोसमातील सौराष्ट्रचे हे दुसरे विजेतेपद ठरले.
या सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकत बंगालला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्यांचा पहिला डाव अवघ्या 174 धावांवर संपुष्टात आणताना आपल्या पहिल्या डावात त्यांनी 404 धावा उभारल्या. त्यानंतर बंगालचा दुसरा डाव 241 धावांवर संपवला व विजयासाठी आवश्यक 14 धावा 1 गडी गमावून पूर्ण करत या सामन्यातील विजयासह विजेतेपदही पटकावले.
That Winning Feeling 🏆 😊
Congratulations to the @JUnadkat-led Saurashtra on their #RanjiTrophy title triumph 🙌 🙌 #BENvSAU | #Final | @saucricket | @mastercardindia
Scorecard 👉 https://t.co/hwbkaDeBSj pic.twitter.com/m2PQKqsPOG
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 19, 2023
बंगालने आपला दुसरा डाव शनिवारच्या 4 बाद 169 धावांवरून पुढे सुरू केल्यावर संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र उनाडकटने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांच्या फलंदाजीची पहिल्या डावाप्रमाणे याही डावात वाताहत केली. मनोज तिवारी 68 व अनुस्तुप मुजुमदारने 61 धावांची खेळी करत लढत दिली. मात्र, अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा दुसरा डाव 241 धावांवर संपुष्टात आला. यावेळी सौराष्ट्रला विजयासाठी अवघ्या 12 धावांची गरज होती. त्यांनी एक गडी गमावून 14 धावा करत लक्ष्य साध्य केले व विजेतेपदही पटकावले. सौराष्ट्रकडून विश्वराज जडेजाने नाबाद 10 तर हार्विक देसाईने नाबाद 4 धावा केल्या. जयदेव उनाडकटला सामन्याचा मानकरी तर अर्पित वासवदाला स्पर्धेचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/india-likely-to-play-asia-cup-2023-games-in-uae-while-rest-of-tournament-will-be-hosted-in-pakistan/
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत उनाडकटला स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला या रणजी अंतिम लढतीत खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्या संधीचे सोने करताना त्याने संघाच्या विजेतेपदात मोठा वाटा उचलला. गेल्या तीन मोसमात तसेच स्पर्धेच्या इतिहासातील सौराष्ट्रने हे दुसरे रणजी विजेतेपद ठरले. यापूर्वी त्यांनी 2019-20 साली विजेतेपद पटकावले होते.
संक्षिप्त धावफलक –
बंगाल पहिला डाव – 174. सौराष्ट्र पहिला डाव – 404. बंगाल दुसरा डाव – 70.4 षटकांत सर्वबाद 241 धावा. (मनोज तिवारी 68, अनुस्तुप मुजुमदार 61, जयदेव उनाडकट 6-85, चेतन सकारिया 3-73).
सौराष्ट्र दुसरा डाव – 2.4 षटकांत 1 बाद 14 धावा. (वश्वराज जडेजा नाबाद 10 तर हार्विक देसाई नाबाद 4, आकाश दीप 1-5).





