Ranji Trophy 2024-25 : मितेश-अतीतची अर्धशतके, दिवसअखेर बडोद्याच्या मुंबईविरूध्द 6 बाद 241 धावा…

Ranji Trophy 2024-25 (Baroda vs Mumbai,Stumps Day 1) : रणजी करंडक 2024-25 स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा थरार शुक्रवार 11 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी विविध मैदानांवर 19 सामने सुरू झाले असून त्यात 38 संघाचा सहभाग आहे. त्यापैकीच एक मुंबई विरुद्ध बडोदा हा सामना वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियम खेळवला जात आहे.
या सामन्यात अव्वल आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशानंतर, मितेश पटेल आणि अतीत सेठ यांनी रणजी करंडक एलिट गटाच्या सामन्यात मुंबईविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी 130 धावांची भागीदारी करत बडोद्याचा डाव सांभाळला.
Tanush Kotian and Shams Mulani strike with 2 wickets each, keeping Baroda at 241/6 after Day 1. #MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/ayYi1j3g80
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 11, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बडोदा संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि धावफलकावर केवळ 90 धावा असताना अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर पटेल आणि सेठ यांनी अर्धशतके झळकावत संघाला दिवसअखेर 87 षटकात सहा विकेट्सवर 241 धावांपर्यंत नेले. पटेलने 159 चेंडूंत 8 चौकारांसह 86 धावा केल्या. पहिल्या दिवशी बाद होणारा तो बडोद्याचा सहावा फलंदाज होता, ज्याला अनुभवी शम्स मुलानीने अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सेठ 143 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने नाबाद 60 धावांवर तर राज लिम्बानी 33 चेंडूत नाबाद 14 धावांवर खेळत होते.
Women’s T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज उपांत्य फेरीच्या जवळ, बांगलादेशवर 8 विकेट्सने मिळवला विजय….
तत्पूर्वी, कर्णधार कृणाल पंड्या (21) सह बडोद्याचे आघाडीचे फलंदाज ज्योत्स्निल सिंह (10), शिवालिक शर्मा (00), शाश्वत रावत (25), विष्णु सोलंकी (18) मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. मुंबईकडून गोलंदाजीत शम्स मुलानी आणि तनुष कोटियनने प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर शार्दुल ठाकूर आणि मोहित अवस्थीने प्रत्येकी एक गडी बाद केला.





