महाबळेश्वर : विहिरीत पडलेल्या रानगव्याला ९ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश

Updated On:

पाचगणी(प्रतिनिधी) : महाबळेश्वरजवळ लिंगमळा येथील ग्रीनवूड सोसायटीच्या खाजगी जागेतील विहिरीत एक रानगवा रविवारी दुपारी पडला होता. महाबळेश्वर ट्रेकर, वन विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक या गव्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते.

अखेर ९ तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशीरा महाबळेश्वर ट्रेकर, वन विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक यांना विहिरीत पडलेल्या रानगव्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर रानगव्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे.

दरम्यान, महाबळेश्वरनजीक लिंगमळा येथे रानगवे मोठ्या संख्येने आढळतात. तेथील ग्रीनवूड सोसायटीच्या खाजगी जागेतील विहिरीत एक गवा रविवारी दुपारी पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांना याबाबत कळविले असता, सुनील भाटिया यांची संपूर्ण टीम ग्रीनवूड सोसायटीत दाखल झाली.

महाबळेश्वर : विहिरीत पडलेल्या गव्याला वाचविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू

गव्याला बाहेर काढण्यासाठी वाईतून हायड्रोलिक क्रेन मागवण्यात आली. वन विभागाचे विशेष पथक कोल्हापुरातून घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर तब्बल ९ तासानंतर क्रेनच्या साह्याने आणि सर्वांच्या मदतीने रानगव्याला बाहेर काढण्याच्या मोहिमेला यश आले आणि रानगव्याचा जीव वाचला.

राज्यात अनेक ठिकाणी रानगवे वाट चुकून शहरी भागात दाखल होत असल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांमध्ये येत आहेत. पुणे शहरात चुकून गेलेल्या एका रानगव्याला जीव गमवावा लागल्याच्या घटनेची आठवण लिंगमळ्यातील घटनेने पुन्हा ताजी झाली आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Gen Z Parenting: 'मुलं बिघडली' की आपण पालक म्हणून हरलो? साताऱ्यातील धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाले मोठे प्रश्न

2026-10-06 00:30:51

Gen Z Parenting: 'मुलं बिघडली' की आपण पालक म्हणून हरलो? साताऱ्यातील धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाले मोठे प्रश्न

Satara DCC Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोडी! ५ ऑक्टोबरला कुणाचा अर्ज बाद होणार? महायुतीचा ठरला 'हा' प्लॅन

2026-10-05 00:30:02

Satara DCC Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोडी! ५ ऑक्टोबरला कुणाचा अर्ज बाद होणार? महायुतीचा ठरला 'हा' प्लॅन

Nhalewadi Leopard Attack: मदत नको, बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा! चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संताप; ग्रामस्थांची जलमंदिर पॅलेसवर धाव

2026-10-05 00:15:23

Nhalewadi Leopard Attack: मदत नको, बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा! चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संताप; ग्रामस्थांची जलमंदिर पॅलेसवर धाव

Satara News : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; साताऱ्यातील घटनेने हळहळ

2026-10-04 08:21:59

Satara News : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; साताऱ्यातील घटनेने हळहळ

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी