Randhir Jaiswal : देशातील ऊर्जा पुरवठा अखंडीत राहणार; रणधीर जयस्वाल यांनी केले स्पष्ट
पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना (Randhir Jaiswal) देशाच्या सागरी वाहतूक आणि ऊर्जा सुरक्षेच्या गरजा पूर्ण केल्या जातील.

Randhir Jaiswal : पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना (Randhir Jaiswal) देशाच्या सागरी वाहतूक आणि ऊर्जा सुरक्षेच्या गरजा पूर्ण केल्या जातील. तसेच ऊर्जा पुरवठ्यासाठी आपले पर्याय वाढवण्यासाठी केंद्र सरकार सर्व ठिकाणांहून एलपीजी खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.
नागरिकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री सरकार करत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी दिली.
देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा विरोधक करत आहेत. मात्र, नागरिकांनी या अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. तसेच देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आता केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. भारत आता रशियाकडून एलपीजी खरेदी करण्याची शक्यता आहे.
याबाबतचे संकेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले. रणधीर जयस्वाल म्हणाले,आम्ही अनेक मुद्द्यांवर इराणच्या संपर्कात आहोत. तसेच ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार रशियाकडूनही एलपीजी खरेदी करण्यास इच्छुक आहे. तसेच जिथे जिथे एलपीजी उपलब्ध असेल तिथून आम्ही तो खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहोत.
त्यामुळे जर रशियाकडून एलपीजी उपलब्ध होत असेल तर आम्ही तिथूनही घेऊ. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की, आपल्या जनतेच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री करणे गरजेचे आहे. आत्ता मी एवढंच सांगू शकतो की आमच्याकडे विविध प्रकारचे पर्याय असले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी (Randhir Jaiswal) स्पष्ट केले.






