Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपट ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री
Ranbir Kapoor : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित 'रामायण' सिनेमा यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे.

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत आहे. या चित्रपटाची एक अपडेट आता समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘रामायण’ मध्ये मेघनादची भूमिका अभिनेता राघव जुयाल साकारणार आहे. ही भूमिका रावणाच्या मुलाची आहे, ज्याला इंद्रजीत म्हणूनही ओळखले जाते.
राघव जुयालला बॉलिवूडमध्ये क्रॉकक्रॉक्स आणि ‘स्लो मोशनचा किंग’ म्हणूनही ओळखले जाते. तो एक प्रसिद्ध डान्सर आहे. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचे दोन भाग बनणार आहे. दुसऱ्या भागात राघव मेघनादची भूमिका साकारणार आहे. आता राघव लवकरच या भूमिकेचे चित्रीकरण सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित ‘रामायण’ सिनेमा यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असून साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. सिनेमात इतरही मोठी स्टारकास्ट आहे.
यश रावण तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. रवि दुबे लक्ष्मणची भूमिका तर शीबा चड्ढा मंथराची भूमिका साकारणार आहे. यात काही साउथ कलाकारही सिनेमात दिसणार आहेत.
सिनेमा २ पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे. पहिला पार्ट यावर्षी तर दुसरा पार्ट पुढील वर्षी येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:






