Love & War Film: ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; रिलीज डेट जाहीर
Love & War Film: पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय

Love & War Film: रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल या तिघांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले असून, नुकतेच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
आता चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज होत आहे.
21 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मोठ्या वीकेंडचा या चित्रपटाला फायदा मिळू शकतो. हा चित्रपट हिंदी तसेच तामिळ आणि तेलुगू भाषेतही जगभरात रिलीज होणार आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, आता भन्साळींचे पूर्ण लक्ष पोस्ट-प्रॉडक्शनवर असणार आहे. निर्मात्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा भव्य रोमँटिक वॉर ड्रामा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाच्या कथेबाबत निर्मात्यांनी सध्या फारशी माहिती जाहीर केली नाही. चित्रपटाचा फर्स्ट लूकही अधिकृतपणे समोर आलेला नाही. मात्र चित्रपटात प्रेम आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाती आणि भावनांची कथा पाहायला मिळू शकते. Love & War Film
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच मोठी उत्सुकता असते. त्यामुळे ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रमोशनकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
रणबीर आणि आलिया ही जोडी लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसले होते. मात्र, तो त्यांचा लग्नाआधीचा चित्रपट होता.
या चित्रपटात त्यांच्यासोबत विक्की कौशल देखील प्रमुख भूमिकेत असून, तो पहिल्यांदाच या जोडीसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
याशिवाय रणबीर कपूर आगामी ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार असून यात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. ‘रामायण’चा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. दुसरीकडे, आलिया भट्ट नुकतीच ‘अल्फा’ या चित्रपटात दिसली होती. Love & War Film
हेही वाचा:
Guava Benefits: सफरचंद महाग झालंय? मग पेरू खा! स्वस्त फळाचे हे ‘7’ जबरदस्त फायदे ऐकून व्हाल थक्क!






