Ranbir Kapoor Account: बॉलिवूड स्टार रणबीर कपूर सोशल मीडियावर नसल्याचं सर्वांना वाटत होतं. फॅन्स त्यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री कधी होणार याची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता रणबीरने स्वतःच खुलासा केला आहे की ते इंस्टाग्रामवर आहेत. फक्त गुपचूप, सीक्रेट अकाऊंटवर! रणबीरचा “फिंस्टा” अकाऊंट दुबईमध्ये एका इव्हेंटदरम्यान रणबीर यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक सीक्रेट इंस्टा अकाऊंट आहे, ज्याला ते “फिंस्टा” म्हणतात. ते म्हणाले, “जगभरात अनेक अद्भुत लोक आहेत ज्यांचं काम मी पाहतो, फॉलो करतो. पण एक अभिनेता म्हणून फॅन्सशी माझं जेवढं इंटरॅक्शन आहे तेवढंच पुरेसं आहे.” म्हणजे ते इंस्टा वापरतात, पण स्वतःची ओळख लपवून. आलियाला फॉलो का करता येत नाही रणबीरला? हा किस्सा स्वतः आलिया भट्टने सांगितला की, रणबीरच्या फिंस्टा अकाऊंटवर फक्त दोन रील्स आहेत. दोन्ही रील्समध्ये ते मुलगी राहासोबत खेळताना दिसतात. त्या अकाऊंटला कोणताही फॉलोअर नाही आलिया म्हणते, “रणबीर मला सुद्धा त्याला फॉलो करू देत नाही. कारण मी फॉलो केले तर सर्वांना कळेल की हे रणबीरच अकाऊंट आहे. आणि ते हे गुपित उघड होऊ द्यायला तयार नाही.”