Satara: जिल्हा बँक मैदानातून रामराजे यांची माघार
Satara श्री. रामराजे नाईक निंबाळकर यांचा बँकेत प्रभाव होता. मात्र, दहा वर्षे संचालक असणाऱ्यांची उमेदवारी अपात्र ठरण्याचे प्रकार घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.

Satara: विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज आज मागे घेले.
बँकेच्या निवडूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची बुधवारी दि. २१ रोजी शेवटची मुदत आहे. रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दि. १९ रोजी फलटण विकास सहकारी संस्था मतदारसंघातील नामनिर्देशनपत्र मागे घेतले. तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृषी प्रक्रिया मतदार संघातूनही त्यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे.
बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. नामनिर्देशन पत्र स्वतः उमेदवार किंवा त्यांनी लेखी प्राधिकृत केलेले सूचक यांनाच मागे घेता येणार आहे.नामनिर्देशन पत्र मागे घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी स्वतः किंवा त्यांनी लेखी प्राधिकृत केलेल्या सूचकानी फोटो ओळखपत्र सह (उदा. आधार, पॅनकार्ड, इत्यादी) समक्ष उपस्थित राहून विहित नमुन्यातील नोटीस दाखल करणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी फक्त नामनिर्देशन पत्र मागे घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना किंवा त्यांच्या प्राधिकृत केलेल्या सूचकासच निवडणूक कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
श्री. रामराजे नाईक निंबाळकर यांचा बँकेत प्रभाव होता. मात्र, दहा वर्षे संचालक असणाऱ्यांची उमेदवारी अपात्र ठरण्याचे प्रकार घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.





