रामनगरी 28 लाख दिव्यांनी उजळणार; भव्य दीपोत्सवानिमित्त अयोध्येत मुख्यमंत्री योगी राहणार उपस्थित

Ayodhya | अयोध्येतील भव्य श्री रामलल्लाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा ५५ घाटांवर तब्बल २८ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहे. हा एक जागतिक विक्रम ठरणार आहे. दीपोत्सवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती असणार आहे.
प्रभूंच्या स्वागतासाठी रामनगरीतील रामकथा पार्कमध्ये ३० ऑक्टोबरला रामाचा राज्याभिषेक होणार असून मुख्यमंत्री योगी राज्याभिषेक करणार आहेत. हेलिपॅडजवळ उभ्या व्यासपीठावर श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, श्री हनुमान व वशिष्ठ मुनींच्या वेशभूषेतील कलाकारांवर पुष्पवृष्टी केली जाईल. यानंतर श्री राम-सीता पूजन झाल्यानंतर तेथे प्रतीकात्मक राज्याभिषेक होईल.
सायंकाळी शरयू तीरावर आरती होणार असून ‘राम की पैडी’वर शुभमुहूर्तावर दीप प्रज्ज्वलित केले जातील. रामकथा पार्कमध्ये रामदरबारासाठी ९० फूट लांबीचा भव्य स्टेज सजवण्यात आला आहे. राज्यपाल आनंदी बेन पटेल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह हे प्रमुख पाहुणे आहेत. या दीपोत्सवानिमित्त लेझर शोचे आयोजन करण्यात आले असून शरयू तीरावर आकर्षक आतषबाजी केली जाणार आहे.
याशिवाय परिसर फुलांनी सजवण्यात येणार आहे. ही दिवाळी अयोध्या केवळ धर्म आणि श्रद्धेचे केंद्र बनत नाही तर स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देते, असा मंदिर ट्रस्टचा प्रयत्न आहे.





