Ramesh Chennithala : राहुल गांधींना संयुक्त नेता म्हणून प्रोजेक्ट करावे; चेन्निथला यांचे विरोधी पक्षांना आवाहन
केरळमचे गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी गुरूवारी भाजपशी राजकीय संघर्ष करणाऱ्या विरोधी पक्षांना आग्रही आवाहन केले.

Ramesh Chennithala : केरळमचे गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी गुरूवारी भाजपशी राजकीय संघर्ष करणाऱ्या विरोधी पक्षांना आग्रही आवाहन केले.
विरोधकांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना संयुक्त नेता म्हणून प्रोजेक्ट करावे. राहुल यांना केंद्रस्थानी ठेऊन प्रचारमोहीम राबवली तरच विरोधकांची आघाडी वर्ष २०२९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकू शकेल, असे भाकीतवजा भाष्य त्यांनी केले.
काही महिन्यांपूर्वी केरळमचे गृहमंत्री बनण्याआधी चेन्निथला (Ramesh Chennithala) कॉंग्रेस पक्ष संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर कार्यरत होते. त्यांनी पीटीआय वृत्तंसस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांना विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचा प्रस्ताव अप्रत्यक्षपणे मांडला.
राहुल हे दूरदर्शी नेते आहेत. देशातील जनतेशी ते कनेक्ट झाले आहेत, असे प्रशंसोद्गार काढत चेन्निथला यांनी भारत जोडो यात्रांचा संदर्भ दिला. यात्रांच्या माध्यमातून राहुल यांनी देशातील कोट्यवधी जनतेला उत्साहित केले. त्यांचे नेतृत्व देशाला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीचा फोकस प्रामुख्याने केंद्र सरकारविरोधातील जनतेच्या वाढत्या रोषावर होता. केंद्र सरकार जनतेसाठी अप्रिय ठरत आहे. देशातील तरूणाई केंद्र सरकारविषयीची नाराजी विविध मार्गांनी व्यक्त करत आहे. त्या सरकारच्या धोरणांविषयीची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. भाजपच्या राजवटीत तरूणाईचा परीक्षा पद्धतीवर विश्वास उरलेला नाही, असा दावा चेन्निथला यांनी केला.
केरळममध्ये भविष्यात डाव्या पक्षांची जागा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून भाजप घेईल का, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी तशी शक्यता फेटाळून लावली. केरळम हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. राज्यातील जनता कधीच भाजपला स्वीकारणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले.





