“प्रियंका गांधींच्या गालासारखे…” ; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान, काँग्रेसचा तीव्र आक्षेप

Ramesh Bidhuri on Priyanka Gandhi । दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सत्ताधारी आप आणि विरोधी बाकावर असलेले भाजप यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरु आहे. त्यातच आता दक्षिण दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. रमेश बिधुरी यांनी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानावर काँग्रेसने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले, “हे गैरवर्तन या माणसाची मानसिकता दर्शवत नाही, तर त्यांच्या मालकांचे वास्तव दर्शवते.”असे म्हणत भाजपवर टीका केली आहे.
प्रियंका गांधींच्या गालासारखे रस्ते निर्माण करू Ramesh Bidhuri on Priyanka Gandhi ।
रमेश बिधुरी यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिधुरी यांनी प्रियांका गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, “लालू म्हणाले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे बनवू, पण ते ते करू शकले नाहीत. लालू खोटे बोलले होते.” पण मी तुम्हाला खात्री देतो, जसे आम्ही ओखलाचे रस्ते आणि संगम विहारचे रस्ते बांधले आहेत. त्याचप्रमाणे कालकाजी सुधार कॅम्पला समांतर आणि आतील रस्ते बांधू ते पण प्रियंका गांधींच्या गालासारखे निश्चितच बनतील.” असे म्हणत नवा वाद ओढावून घेतला आहे.
BJP घोर महिला विरोधी है
रमेश बिधूड़ी का प्रियंका गांधी जी के संदर्भ में दिया बयान शर्मनाक ही नहीं उनकी औरतों के बारे में कुत्सित मानसिकता दिखाता है
लेकिन जिस आदमी ने सदन में अपने साथी सांसद को गंदी गालियां दी हों, और कोई सज़ा ना मिली हो उससे और क्या उम्मीद की जा सकती है?… pic.twitter.com/JRdC9bxzrw
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) January 5, 2025
काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया Ramesh Bidhuri on Priyanka Gandhi ।
दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी रमेश बिधुरी यांच्या या व्हिडीओवरून त्यांच्यावर आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी बिधुरी यांच्या वक्तव्यावर बोलताना भाजपला महिलाविरोधी पक्ष म्हणून संबोधले आहे. “भाजप अत्यंत महिलाविरोधी आहे. रमेश बिधुरी यांनी प्रियंका गांधींबाबत केलेले वक्तव्य केवळ लज्जास्पदच नाही तर त्यांची महिलांबाबतची आजारी मानसिकताही दर्शवते. पण ज्या माणसाने सभागृहात आपल्या सहकारी खासदाराला शिवीगाळ केली आणि त्याला शिक्षा झाली नाही त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता येईल?” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
पुढे बोलताना सुप्रिया श्रीनेट यांनी, “हा भाजपचा खरा चेहरा आहे. या वाईट भाषेवर आणि विचारसरणीवर भाजपच्या महिला नेते, महिला विकास मंत्री, नड्डा जी किंवा खुद्द पंतप्रधान काही बोलतील का? खरे तर या वाईटाचे जनक आहेत. मंगळसूत्र आणि मुजरा सारखे शब्द बोलणारे मोदीजीच महिला विरोधी आहेत – मग त्यांच्या या गरीब विचारसरणीबद्दल आम्ही माफी मागावी.





