सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का ; पक्षाचा ‘हा’ बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार ?

Ramesh Baraskar । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच घरघर लागली असल्याचे दिसत आहे. कारण मविआमधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत. त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
रमेश बारसकर अनेक नेत्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार ? Ramesh Baraskar ।
गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक, दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते.मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मविआतील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेने सोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे.
धाराशिव जिल्ह्यात भाजपचे ‘ऑपरेशन टायगर’ Ramesh Baraskar ।
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिवमध्ये आले होते. यावेळी त्यांनी धाराशिवमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याचे संकेत दिले होते. भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जननेते दाखवून दिलं आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते.





