Ramdas Kadam : भास्कर जाधवांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांना रामदास कदमांनी दिले जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याबाबत नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला. 2009 साली कदम यांनी निवडणुकीत विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा भास्कर जाधवांकडून करण्यात आला. यानंतर आता रामदास कदम आक्रमक झाले असून भास्कर जाधवांच्या दाव्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांनंतर कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, एवढा मोठा माणूस तो नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितलं होतं. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही, काळी विद्या करून तुम्ही आणि तुमचं कुटुंब दमलं, भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसं करायचं हे भास्कर जाधव यांच्याकडून शिकावं असं कदम म्हणाले आहेत.
तसेच कदम पुढे म्हणाले, शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जावून आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तुम्ही येवू नका. भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असं ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त 1200 मतांनी निवडून आलेले आहेत अशी टीका रामदास कदमांनी केली आहे. कदम यांना आता भास्कर जाधव काय उत्तर देणार हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.





