रामदास आठवले विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढणार; सांगितल्या किती जागा लढणार

ramdas athawale । लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. १ जूनला अखेरच्या टप्प्यात मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र त्या अगोदरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे.
तर हरिणायामधील विधानसभा 3 नोव्हेंबर रोजी विसर्जित होत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या निवडणूक एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात. म्हणजेच राज्यात दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशात लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राज्यात विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युतीत न जाता स्वतंत्र लढणार आहे. रिपाई (RPI) पक्षाच्या आठवले गटाच्या प्रदेशची कार्यकारिणी आढावा बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी विधानसभेच्या दहा तर, मुंबई महापालिकेत 20 जागा लढवणार असल्याची घोषणा रिपाई पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
या बैठकीत रामदास आठवले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभेत पक्षाची काय भूमिका राहील, यावर मार्गदर्शन करत मनोबल वाढले.बैठकीत सूचना देतांना ते म्हणाले, रिपाई पक्षात वेगवेगळ्या आघाड्या आहेत. सर्वसमावेश, अशी पक्षाची ओळख असल्याचे सांगून विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत पक्ष मैदानात असणार असल्याचे सांगून तयारी लागा, अशा सूचना रामदास आठवले यांनी केल्या.





