Ramdas Athawale : …तर पाकिस्तानसोबत युद्ध करा, आठवलेंनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारकडे एक मोठी मागणी केली.
काय म्हणाले रामदास आठवले ?
जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत, याकरिता माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं चारही बाजुनं पाकिस्तानची कोंडी केली आहे. जगातील अनेक मोठ्या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला आहे. भारताकडून सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे.





