“आम्हाला दोन जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही एनडीएमध्ये…” ; रामदास आठवलेंनी केला मोठा खुलासा

Ramdas Athavale। देशात येत्या 19 एप्रिल पासून लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्यात सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होणे बाकी आहे. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षासाठी २ जागांची भाजपकडे मागणी केली आहे. त्यांनी या निवडणुकीत आपले २ तरी खासदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात दोन जागा मिळण्याची अपेक्षा Ramdas Athavale।
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्रात दोन जागा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु तसे झाले नाही तरी ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर होतील कि सोबत राहतील या प्रश्नावर मोठा खुलासा केला आहे.
रामदास आठवले यांचा पक्ष आरपीआय (ए) हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा एक भाग आहे. ते म्हणाले की, त्यांच्या पक्षाला शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आशा आहे. राज्यात आरपीआय (ए) ला दोन जागा लढवता न आल्यास त्यांची प्रतिक्रिया काय असेल असे विचारले असता, आठवले म्हणाले की त्यांच्या पक्षाच्या संपूर्ण भारतातील उपस्थितीचा भाजप आणि एनडीएला फायदा होईल.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
आम्हाला जागा दिली नाही तरी आम्ही एनडीएसोबत Ramdas Athavale।
पुढे बोलताना आरपीआय (ए) नेते “ते आम्हाला जागा देणार नाहीत असे नाही पण त्यांनी आम्हाला जागा दिली नाही तरी आम्ही एनडीएसोबत राहू कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबेडकरी जनतेसाठी काम केले आहे आणि ते त्यांच्यासोबत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग अवलंबला आहे.” असे म्हणाले.
हेही वाचा
“मी शिर्डीतून लोकसभा लढवतो, अन् शिंदे गटाच्या खासदाराला…”; रामदास आठवलेंचा प्रस्ताव





