Ramayana Film : ‘पंचायत’ फेम अभिनेता दिसणार रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटात; कोणती भूमिका साकारणार?
Ramayana Film : 'पंचायत'मध्ये 'प्रल्हाद'ची भूमिका साकारणारा अभिनेता फैसल मलिक 'रामायण'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

Ramayana Film : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. या सिनेमात ‘पंचायत’ या प्रसिद्ध वेब सीरिजमधील एका लोकप्रिय अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
‘पंचायत’मध्ये ‘प्रल्हाद’ची भूमिका साकारणारा फैसल मलिक ‘रामायण’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रामायण’ मध्ये कुंभकर्णाची भूमिका करण्यासाठी ‘पंचायत’ फेम अभिनेता फैसल मलिकची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी बॉबी देओलचे नाव सुचवण्यात आले होते.
फैसल मलिकच्या ‘रामायण’मधील एन्ट्री बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र सोशल मीडियावर फैसल मलिकच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. Ramayana Film
मिळालेल्या माहितीनुसार, फैसलने त्याच्या पहिल्या सीनचे शूटिंगही पूर्ण केले आहे. मुंबईतील प्राइम फोकस स्टुडिओमध्ये त्यांनी ‘रावण’ची भूमिका साकारणाऱ्या दाक्षिणात्य सुपरस्टार यश सोबत आपला सीन शूट केला असल्याचेही म्हंटले जात आहे.
दोन भागांत येणार ‘रामायण’
नितेश तिवारी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर कपूर ‘रामायण’ चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारत आहे, तर साई पल्लवी देवी सीतेची भूमिका साकारणार आहे.
केजीएफ स्टार यश चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल आणि रवी दुबे हनुमान आणि लक्ष्मणची भूमिका साकारणार आहेत. Ramayana Film
काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंह मंदोदरी आणि शूर्पणखा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अरुण गोविल, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, शीबा चड्ढा आणि इंदिरा कृष्णन हे देखील ‘रामायण’ चा भाग असणार आहेत.
‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीत आणि चित्रपटाचा दुसरा भाग 2027 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. Ramayana Film
हेही वाचा:






