Rohit Pawar: “बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नाही”; रोहित पवार भावुक
Rohit Pawar : अजित दादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढणार असल्याची शक्यता

Rohit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्हयातील राहुरी या मतदारसंघाचा देखील समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने रविवारी 15 मार्च 2026 रोजी देशभरातील विविध राज्यांतील ८ विधानसभा रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. गेली अनेक दशकं बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा निवडून येत होते. आता दादांच्या जागेवर पोटनिवडणूक होत असल्याने रोहित पवार (Rohit Pawar) भावूक झाले.
रोहित पवार म्हणाले, “ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा होत असे, त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही. Rohit Pawar
Oscar Awards 2026: प्रियांका चोप्राचा पती निक जोनाससोबत ऑस्करच्या रेड कार्पेटवर जलवा
पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं,” असे म्हणत रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली..
कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 15, 2026
अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक 1991 ते 2024 या कालावाधीत सलग 8 वेळा लढवली आणि सर्व वेळा त्यांनी विजय मिळवला. दरम्यान, अजित दादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे. Rohit Pawar
हेही वाचा:
IRGC Navy Chief: “जर खर्गवर हल्ला झाला…” ; आयआरजीसी नौदल प्रमुखांची अमेरिकेला उघड धमकी






