Ramayana Box Office : रामायणला मिळाली मोठी ओपनिंग; पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
Ramayana Box Office : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण: राइज ऑफ ए लीजेंड' चित्रपटातील शानदार व्हिज्युअल्सपने प्रेक्षकांना खेळवून ठेवले आहे.

Ramayana Box Office : गेल्या बराच काळापासून प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो चित्रपट काल ५ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रामायण चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला असून आता पहिल्या दिवशीच्या बॅाक्स अॅाफिस कमाईचे आकडे समोर आला आहेत.
सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये मिळून ६४.८५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. तसेच याचे इंडिया ग्रॉस कलेक्शन ७७.५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वीकेंडमध्ये रामायण उत्तम कामगिरी करू शकतो असा अंदाज लावला जात आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: राइज ऑफ ए लीजेंड’ चित्रपटातील शानदार व्हिज्युअल्सने प्रेक्षकांना खेळवून ठेवले आहे. चित्रपटात असलेल्या सर्व पात्रांचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे रावणाची व्यक्तिरेखा साकारलेल्या अभिनेता यशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटातील जटायू आणि रावण यांच्यातील युद्धांच्या सीनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.
‘रामायण’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये हिंदी व्हर्जनचे योगदान सर्वात मोठे राहिले आहे. चित्रपटाने हिंदी भाषेत ४७.५० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. मात्र, इतर व्हर्जनमध्ये चित्रपटाची कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. पाचही भाषांमध्ये मिळून चित्रपटाचे एकूण इंडिया नेट कलेक्शन ६४.८५ कोटी रुपये केले आहे.
‘रामायण’ ‘धुरंधर २’ चा रेकॉर्ड मोडू शकला नसला, तरी पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत त्याने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे सोडले आहे. यामध्ये पठाण, अॅनिमल आणि दृश्यम २ या महत्वाच्या चित्रपटांचा समावेश होतो. सध्या दिवाळी सण असल्याने वीकेंडमध्ये मोठ्या कमाईचा आकडा चित्रपट पार करू शकतो. हे प्रेक्षकांच्या माऊथ पब्लिसिटीवर अवलंबून असणार आहे.






